Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशन, सर्वांच्या नजरा आलिया-रणबीरवर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:29 IST

सोमवारी मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

सोमवारी मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, आमिर खान, माधुरी दीक्षित, आलिया भट, रणबीर कपूर असे अनेक सेलिब्रिटी यावेळी पारंपरिक लूकमध्ये दिसले. अंबानी कुटुंबाने अगदी उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या अ‍ॅन्टीलिया या घरावर मोठ्या प्रमाणात रोशनाई करण्यात आली होती.

इशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नानंतरचा अंबानी कुटुंबातील यंदाचा पहिला गणेशोत्सव आहे. त्यामुळे धूमधडाक्यात तो साजरा झाला.

या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट या कपलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनीही एकत्र एन्ट्री घेतली आणि मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे रोखले गेलेत.

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही अंबानींच्या घरच्या बाप्पचे दर्शन घेतले.

सदाबहार अभिनेत्री रेखा याही यावेळी हजर होत्या.

पाहा, अंबानींच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या सेलिब्रिटींगचे पाहा फोटो...

टॅग्स :गणेशोत्सवसेलिब्रिटी गणेशआलिया भटरणबीर कपूरमुकेश अंबानीआकाश अंबानी