Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yami Gautam Pregnant : यामी गौतम होणार आई! लग्नाच्या तीन वर्षांनी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:38 IST

यामी गौतम लवकरच आई होणार आहे. तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही महिन्यात गुडन्यूज दिली आहे. नुकतंच अभिनेता विक्रांत मेसी बाबा झाला. तर अभिनेत्री अनुष्का शर्माही दुसऱ्यांदा आई होणार आहे. आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम लवकरच आई होणार आहे. तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, यामी गौतम साडे पाच महिन्यांची गरोदर आहे. पण, अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मे मध्ये यामी गौतम तिच्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच यामीचा एक व्हिडिओही समोर आला होता. यामध्ये ती ओढणीने पोट लपवताना दिसत होती. तेव्हादेखील यामी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

यामीने २०२१मध्ये आदित्य धारसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाच्या सेटवर ते एकमेकांना भेटले होते.  पारंपरिक पद्धतीने केलेल्या यामीच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नानंतर तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आईबाबा होणार आहेत. 

यामीने २०२१ साली विकी डोनर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बाला', 'बत्ती गुल मीटर चालू', 'दसवी', 'ओएमजी २' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये ती झळकली. हिंदीबरोबरच तिने तेलुगु चित्रपटांतही काम केलं आहे. 'आर्टिकल 370' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :यामी गौतमसेलिब्रिटी