Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पोस्टवर सुष्मिता सेनने केली कमेंट, म्हणाली- मी खूप....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:46 IST

रवी जाधव यांच्या पोस्टवर सुष्मिता सेनने केलेल्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)ने नेहमीच आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुष्मिताची आगामी वेबसीरिज ताली (Taali) चर्चेत आली आहे. नेहमीपेक्षा वेगळा विषय असणाऱ्या या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ताली वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या अस्तित्वासाठी तिला समाजात खूप काही सहन करावे लागते. तिला तिच्या हक्कासाठी लढावं लागतं. समाजाशी सामना करत ती एक किन्नर ते सोशल वर्कर बनते. तिचा हा प्रवास सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सुष्मिता सेन या सीरिजमध्ये पॉवरफुल अंदाजात पाहायला मिळणार आहे. 

रवी जाधव यांनी ताली वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तालीच्या संबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली आहे. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. रवी जाधव यांच्यासोबत यात सुष्मिता सेनदेखील दिसतेय. 

हा फोटो शेअर करताना रवी जाधव यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ''सिर्फ़ ५ दिन बाक़ी है। उम्मीद है की ‘ताली’ देखकर दुनिया खुशीसे ताली बजायेंगी..और हम याद करेंगे उन छोटे छोटे लम्हों को जिन्होंने ताली को तराशा!!!''  रवी जाधव यांच्या पोस्टवर सुष्मिताने देखील कमेंट केली आहे. I love you Sir!!!!  मी खूप उत्साही आहे, असं तिने लिहिलेय.  अनेक मराठी सेलब्रेटींनी देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

तालीमध्ये सुष्मितासोबत बऱ्याच मराठी इंडस्ट्रीतील कलाकरांनी देखील काम केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसिरीजची खूप चर्चा आहे.

टॅग्स :रवी जाधवसुश्मिता सेन