Join us

टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:25 IST

बागी ४ मध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. स्वतः टायगर श्रॉफने याविषयी सर्वांना माहिती दिलीय

'बागी ४' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'बागी' युनिव्हर्सचे याआधीचे तीनही सिनेमे प्रचंड गाजले. अॅक्शन सिनेमांची आवड असणाऱ्या प्रेक्षकांचं 'बागी'साठी स्वतःचं फॅन फॉलोईंग आहे. 'बागी ४'ची उत्सुकताही शिगेला आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी सिनेमातील टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचा रक्तरंजित लूक व्हायरल झाला होता. 'बागी ४' मध्ये हिरोईन कोण असणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याबद्दल खुद्द टायगर श्रॉफनेच खुलासा केलाय.

ही अभिनेत्री 'बागी ४' मध्ये दिसणार

'बागी ४'चा मुख्य अभिनेता टायगर श्रॉफने याविषयी सोशल मीडियावर खास पोस्ट केलीय. अभिनेत्री सोनम बाजवाची 'बागी ४'मध्ये एन्ट्री झालीय. फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोनम बाजवा 'बागी ४'मध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं. हाउसफुल्ल युनिव्हर्ससारखं 'बागी'चं स्वतःचं युनिव्हर्स तयार होत असून आता सिनेमाच्या चौथ्या भागात सोनम बाजवाची एन्ट्री झालीय.

बागी ४ सिनेमाबद्दल

टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "रिबेल कुटुंबातील नवीन सदस्याचं स्वागत. बागी युनिव्हर्स, साजिद नाडियादवाला यांच्या 'बागी ४' मध्ये सोनम बाजवाचा सहभाग झाल्याने मी खूप उत्साही आहे." 'बागी' युनिव्हर्समध्ये याआधी दिशा पाटनी आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्री झळकल्या होत्या. आता 'बागी ४' मध्ये सोनम बाजवा मुख्य हिरोईन म्हणून काम करणार आहे. ५ सप्टेंबर २०२५ ला 'बागी ४' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफदिशा पाटनीश्रद्धा कपूर