बॉलिवूडमध्ये मीटू चळवळी अंतर्गत बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यावरील आपबीती जगासमोर आणली. नुकतेच अभिनेत्री अहाना कुमराने आपले अनुभव शेअर केला. अहानाने दिग्दर्शक व अभिनेता प्रकाश झा यांच्याविरोधात विधान केले आहे. एका वाहिनीशी बोलताना अहानाने सांगितले की, इंटीमेट सीनच्या दरम्यान तिच्यासोबत काय घडले होते.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, अहानाने २०१७ साली लिपस्टिक अंडर माय बुरखा चित्रपटाचे शूटिंग केले होते. या चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा होते. अहाना सांगते की, मला आठवते की एक दिवस प्रकाश झा आमच्या सेटवर आले होते. त्यावेळी मी एक इंटीमेट सीन शूट करत होते. ते सेटवर आले तेव्हा त्यांनी अशी कमेंट केली जी ऐकून मला अनकम्फर्टेबल वाटू लागले.
अहाना पुढे सांगते की, मी हैराण होती की मला प्रकाश झा यांच्याकडून अशी कमेंट मिळेल. या घटनेनंतर मी चित्रपटाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवकडे गेली आणि तिला सांगितले की हे माझे दिग्दर्शक नाहीत. तर ते या चित्रपटाच्या सेटवर का आहेत आणि मला त्यांची कमेंट का ऐकावी लागत आहे?
मी त्यांचा आदर करते आणि त्यांना माहित असले पाहिजे की ते फक्त चित्रपटाचे निर्माते आहेत. माझे ऐकून घेतल्यानंतर दिग्दर्शिका अलंकृताने प्रकाश झाला तिथून जायला सांगितले. त्यांना कळले होते की ते आजूबाजूला असतील तेव्हा मी कम्फर्टेबल नसते. ते काही न बोलता तिथून निघून गेले. त्यांनी दाखवलेला समजूतदारपणा चांगला होता.
लिपस्टिक अंडर माय बुरखा चित्रपटात अहाना कुमरा व्यतिरिक्त रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, प्लाबिता बोर्थठाकूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. अहाना शेवटची द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने प्रियंका गांधीची भूमिका केली होती. आता ती शमशेरामध्ये दिसणार आहे.