Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रिकव्हरीच्या दरम्यानचा फोटो शेअर केला बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं, व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:46 IST

या अभिनेत्रीने कर्करोगावर यशस्वी मात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. बराच मोठा काळ संघर्ष केल्यानंतर तिने या आजारातून मुक्तता मिळवली आहे. कर्करोगाशी यशस्वी सामना केल्यानंतर मनीषाने त्यावेळचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मनीषा कोईरालाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात दोन फोटो आहेत. त्यातील पहिल्या फोटोत ती हॉस्पिटलमध्ये बेडवर दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत ती पर्वताच्या टोकावर उभी आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं की, या दुसऱ्या संधीसाठी मी जीवनाची नेहमीच आभारी राहीन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स... ही खूप चांगले जीवन आहे आणि संधी आहे मस्त व स्वस्थ जीवन जगण्याची.

मनीषा कोईराला शेवटची राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजू चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने संजय दत्तच्या आई नरगिस यांची भूमिका केली होती. या चित्रपटात तिची छोटीशीच भूमिका होती मात्र सर्वांनी तिच्या भूमिकेचं खूप कौतूक केलं होतं.

या चित्रपटानंतर ती बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

टॅग्स :मनिषा कोईरालासंजू चित्रपट 2018