Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सत्यापेक्षा सनसनाटीला महत्त्व देणं...", अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवीने व्यक्त केला संताप, भावाला पाठिंबा देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:41 IST

"एखाद्याला बळीचा बकरा बनवून...", भाऊ अर्जुन कपूरसाठी जान्हवी उतरली मैदानात, ट्रोलर्सची घेतली शाळा 

Janhvi Kapoor: अभिनेता जान्हवी कपूरबॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. जान्हवीने २०१८ मध्ये इशान खट्टरसह 'धडक' चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. सध्याच्या घडीला जान्हवी इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक नायिका म्हणून गणली जाते.जान्हवी कपूर तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि प्रत्येकासोबत एक तिचं एक खास नातं आहे. सध्या अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मुलाखतीमध्ये तिने भाऊ अर्जुन कपूरच्या सोशल मीडिया ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच ग्राझियाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, सोशल मीडियावर कोणालाही लक्ष्य करणं किंवा ट्रोल करणं पूर्णपणे चुकीचं आहे. असं तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं. या संवादादरम्यान, जान्हवीने म्हटलं,"सोशल मीडिया ट्रेंडबद्दल मला आता समजलंय की प्रत्येकाला व्ह्यूज आणि प्रसिद्धी हवी असते. म्हणून जर ते तुमच्याबद्दल कंटेंट तयार करत असतील तर तुम्ही फक्त बळीचा बकरा आहात. कोणत्याही गोष्टींची पडताळणी न करता तुमचं नाव क्लिकबेइटसाठी वापरत आहेत.हे एखाद्याला टार्गेट करण्यासारखं आहे, जिथे सत्यापेक्षा सनसनाटीला जास्त महत्त्व दिलं जातं."

पुढे ती म्हणाली, "प्रत्येकाला जबाबदारी असते. आपलं घर चालवायचं असतं. मात्र,असे गैरसमज पसरवले गेले  तर खूप वाईट वाटतं. जसं मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये किती अडकायचं हे वेळीच कळणं गरजेचं आहे. नकारात्मकता ही नकारात्मकतेला जन्म देते आणि तुम्हाला फक्त अशा गोष्टीपासून कसं लांब राहता येईल, याकडे लक्ष द्यायचं आहे."

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती  सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटात दिसली होती.  लवकरच जान्हवी राम चरण स्टारर 'पेड्डी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Janhvi Kapoor defends Arjun Kapoor against online trolls, expresses anger.

Web Summary : Janhvi Kapoor slams social media trolling targeting brother Arjun. She highlights the trend of prioritizing sensationalism over truth for views. Janhvi emphasizes the importance of ignoring negativity and focusing on personal well-being. She was recently seen in 'Sunny Sanskari ki Tulsi Kumari'.
टॅग्स :जान्हवी कपूरअर्जुन कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी