Join us

"आपल्या कामाशी काम ठेवा...",  हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या वृत्तांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:13 IST

 हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या चर्चांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली...

Huma Qureshi: अभिनयाची क्षमता आणि सौंदर्याने रुपेरी पडदा व्यापणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. 'गँग ऑफ वासेपूर','डेढ़ इश्किया','बदलापूर' या चित्रपटातून व ओटीटीवरील वेबसीरीज 'लीला' आणि 'महाराणी' मधून आपल्या अभिनयाने चित्रपटप्रेमींच्या मनात तिने विशेष स्थान निर्माण केलं. अलिकडेच या सिनेविश्वात या अभिनेत्रीच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरैशीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत. एकीकडे गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा सुरु असताना आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या क्रिप्टिक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, अलिकडेच हुमा कुरेशीच्या एका मैत्रीणीने सोशल मीडियावर एका खासगी सोहळ्यातील फोटो शेअर केला होता. त्यादरम्यानची तिची इन्स्टाग्राम स्टोरी तुफान व्हायरल झाली. अकासा सिंगची ती स्टोरी पाहिल्यानंतर अनेकांनी हुमाने बॉयफ्रेंड  रचित सिंहबरोबर साखरपुडा केला असल्याचे तर्क-वितर्क लावले. अकासाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हुमा आणि रचितबरोबरच्या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहलं, "रचित व हुमा तुम्ही तुमच्या Piece of Heaven ला एक नाव दिल्याबद्दल अभिनंदन. ही रात्र खूप छान होती". हुमा ही रचितच्या खासगी वाढदिवस पार्टीचाही भाग होती. या दोघांना आधी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात एकत्र पाहिले गेले होते. 

याच चर्चांदरम्यान तिने साखरपुड्याच्या बातमीवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे. हुमाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून ती सध्या दक्षिण कोरियामध्ये असल्याचं दिसून येतंय. या फोटोसोबत हुमाने एक हटके कॅप्शन देत म्हटलंय की, "प्रत्येकाने शांत राहून आपल्या कामाशी काम ठेवणं गरजेचं..."असं म्हणत अभिनेत्रीने चर्चा करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. मात्र, साखरपुड्याबद्दल अभिनेत्रीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

कोण आहे हुमाचा बॉयफ्रेंड रचित सिंग?

हुमाचा बॉयफ्रेंड रचित सिंग हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक (Acting Coach) असून तो स्वतःही एक अभिनेता आहे. त्याने आलिया भट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण दिले आहे. हुमाच्या बॉयफ्रेंडने 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अनेक वर्षांपासून तो मुंबईमध्ये कार्यरत आहे. एका रिपोर्टनुसार, त्याने २०१६ मध्ये अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी मुंबई गाठले आणि अतुल मोंगिया यांच्यासोबत काम सुरू केलं.

टॅग्स :हुमा कुरेशीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया