Join us

Valentines Day : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचं ब्रेकअप? पोस्ट होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:21 IST

अख्खं जग प्रेमात बुडालेलं असताना मात्र प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदय तुटलं आहे. खुद्द अभिनेत्रीनेच याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

१४ फेब्रुवारी हा दिवस सगळीकडे व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. अनेक जण या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात. कपल व्हॅलेंटाइन डे आनंदात साजरा करतात. अख्खं जग प्रेमात बुडालेलं असताना मात्र प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदय तुटलं आहे. खुद्द अभिनेत्रीनेच याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

अमायरा दस्तुर हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात केलेल्या अमायराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबरोबरच ती वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असते. नुकतंच तिच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. अमायराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "लाइफ अपडेट : गोष्टी इतक्या सोप्या नसतात. हा ब्रेकअप सोपा नव्हता," असं कॅप्शनही दिलं आहे. अमायराची ही पोस्ट पाहून तिचं व्हॅलेंटाइनलाच ब्रेकअप झालं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

अमायराने २०१३ साली इश्क सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'मिस्टर एक्स', 'कलाकंदी', 'राजमा चावल' अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली. 

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेसेलिब्रिटी