अभिनेत्री एमी जॅक्सन एका फोटोमुळे खूप चर्चेत आली होती. या फोटोवरून एमी लेस्बियन असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोत एमीसोबत तिची मैत्रिण होती. एमी मैत्रिणीला मागून अलिंगन देताना यात दिसतेय. पण या फोटोसोबत ‘वाईफ लाईफ’ असे कॅप्शन एमीने दिले होते. त्यामुळे लेस्बियन असल्याच्या चर्चा झाली होती.एमीसोबतची फोटोतील मुलगी युकेची मॉडेल नीलम गिल होती. नीलमनेही एमीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, तिने दिलेले कॅप्शन पाहूनही अनेकांना धक्का बसला आहे. 'लाईफ बॉल विद वाइफी एमी जॅक्सन...'असे तिने लिहिले होते. या फोटोसोबत तिने दोन वधूंची ईमोजीही टाकली आहे.
ती गरोदर असल्याची बातमी तिनेच सोशल मीडियाद्वारे दिली होती.