Bollywood Movies: चित्रपट असो किंवा मालिका कलाकारांनी त्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची कायम चर्चा होत असते. शिवाय आपल्या अभिनयाने हे कलाकार कामाची दखल देखील घ्यायला भाग पाडतात. अशीच एक अभिनेत्री जिने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकून इंडस्ट्रीतील टॉपच्या नायिकांच्या यादीत स्थान मिळवलं. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची क्वीन बेबो म्हणजेच करिना कपूर आहे. दरम्यान, करीना कपूरने २००० साली आलेल्या 'रिफ्यूजी' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. 'जब वी मेट'मधील गीत ते 'कभी खुशी कभी गम'मधील पू अशा दमदार भूमिका करीनाने अने साकारल्या आहेत. मात्र, असा एक सिनेमा ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती.
करीना कपूरचा चित्रपट 'चमेली' २००३ साली प्रदर्शित झाला होता. यात बेबोनं सेक्स वर्कर चमेलीची भूमिका केली होती. परंतु, तुम्हाला माहितीये का चमेली साठी करीना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. चमेलीसाठी निर्मात्यांनी 'कहो ना प्यार है' फेम अमिषा पटेलला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण काही कारणास्तव अमिषाने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि नंतर ही भूमिकेसाठी करीनाला विचारणा करण्यात आली. दरम्यान, 'चमेली' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केलं होतं. यात करीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमातील करीनाच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते.