Join us

"जे काही घडलं ते धक्कादायक...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली अमिषा पटेल, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:46 IST

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.

Ameesha Patel Reaction On Saif Ali khan: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात एका अज्ञाताने घुसून चाकुने वार केले. गुरुवारी (१६ जानेवारी २०२५) ला रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात सैफ गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने लीलावती रुग्णायलयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी अपडेट दिली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. 

अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली आहे. नुकतीच 'झुम'सोबत बातचीत करताना अभिनेत्री म्हणाली, त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "सैफ अली खानसोबत जे काही घडलं ती घटना धक्कादायक आणि टेन्शन वाढवणारी आहे. हे फार वाईट आहे. कोणासोबतही असं घडू नये."

पुढे अभिनेत्री सैफ अली खानचं कौतुक करत म्हणाली, "मी फक्त एवढंच म्हणेन की सैफ एक धाडसी माणूस आहे, मला त्याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. शिवाय आम्ही दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतो. लवकरच तो बरा होऊन घरी परत यावा, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. सैफने ही घटना घडताना त्याच्या मुलांच्या रक्षणासाठी जे काही केलंय ते करण्यासाठी खरी हिंमत लागते." 

टॅग्स :सैफ अली खान अमिषा पटेलबॉलिवूडसेलिब्रिटी