Join us

महिना फक्त १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता, नाव वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:05 IST

आर्थिक संकटात असताना या अभिनेत्याला संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी आसरा दिला होता.

झगमगत्या दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांना पदार्पण करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कष्टाने आणि कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. असाच एक बॉलिवूडमधील अभिनेता ज्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी महिना १५०० रुपये पगारावर काम केले आहे. हे अभिनेते म्हणजे शक्ती कपूर. 

शक्ती कपूर यांनी १९७२ साली रिलीज झालेला चित्रपट जानवर और इन्सानमधून बॉलिवूडमधील करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्यांना कुर्बानी चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले. आजही शक्ती कपूर यांनी साकारलेल्या निगेटिव्ह आणि कॉमेडी भूमिका प्रेक्षकांच्या घरात घर करून कायम आहेत. 

खरेतर शक्ती कपूर यांना बॉलिवूडमध्ये यायचे नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांना भारतीय क्रिकेट टीमचा हिस्सा बनायचे होते. मात्र नशीबाने त्यांना अभिनेता बनवले. ते बॉलिवूडमध्ये आले तेव्हा त्यांचे नाव सुनील होते. तसेच सुरूवातीला ते सिनेइंडस्ट्रीत नवखे असल्यामुळे त्यांना जास्त चित्रपटात कामदेखील मिळत नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांना संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी आसरा दिला. हे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

याबद्दल शक्ती कपूर यांनी सांगितले की, ते मला दर महिना १५०० रुपये द्यायचे, ज्यात मी माझा खर्च भागवायचो. त्यानंतर शक्ती कपूर यांचा एक अपघात झाला होता त्यावेळी त्यांची फिरोज खान यांच्याशी भेट झाली आणि त्यांना कुर्बान हा सिनेमा मिळाला. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

शक्ती कपूर यांचा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यामध्ये समावेश होता. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही सुद्धा बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

टॅग्स :संजय दत्तशक्ती कपूरसुनील दत्त