Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवेक ओबेरॉयने धनत्रयोदशीला घेतलं नवं घर! लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिलं गोड सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:05 IST

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला एक खास सरप्राइज दिलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहू्र्तावर अभिनेता नव्या घरात शिफ्ट झाला आहे. 

Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (vivek Oberoi) करिअरबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. 'साथिया' या सिनेमातून तुफान त्याने प्रचंड  लोकप्रियता मिळवली. करिअरच्या सुरुवातीला विवेकने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. परंतु सध्या अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. अगदी काल (२९ ऑक्टोबर) च्या दिवशी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने पत्नी प्रियांकाला खास सरप्राइज दिलं आहे. त्यांच्या सुखी संसाराला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच दरम्यान धनत्रयोदशीच्या शुभ मुहू्र्तावर अभिनेता नव्या घरात शिफ्ट झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत विवेकने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

विवेक ओबेरॉयने नव्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करतानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायत. सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

या फोटोंमध्ये विवेक ओबेरॉयने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे तर पत्नी प्रियांकाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. लग्नाचा वाढदिवस त्यासोबतच दिवाळी सण असा सुंदर योग एकाच दिवशी जुळून आल्याने विवकने बायकोला अत्यंत गोड सरप्राइज दिलंय. फोटोंमध्ये विवेक आणि प्रियांका दोघेही रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. 

विवेक ओबेरॉयने आपल्या अभिनय कारकिर्दीत 'साथिया', 'मस्ती', 'युवा', 'शूटआउट ॲट लोखंडवाला' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया