Join us

बहुचर्चित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' दिवशी होणार OTT वर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:16 IST

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (vikrant massey) मुख्य भूमिकेत असलेला 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.

The Sabarmati Report OTT Release: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (vikrant massey) मुख्य भूमिकेत असलेला 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा गुजरातच्या गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा रंगली. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवता आलेलं नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलं होतं. आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. 

'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. मात्र, आता हा  चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवरही स्ट्रीम करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विक्रांत मेस्सीचा हा बहुचर्चित चित्रपट येत्या १० जानेवारी २०२५ मध्ये या 'ZEE 5' ओटीटी प्लटफॉर्मवर पाहता येणार आहे.  

'द साबरमती रिपोर्ट' सिनेमात  विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये स्थानिक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य काही नेत्यांनी या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा