Sunny Kaushal: दक्षिण मुंबईतील 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल' (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. हा सांस्कृतिक कार्यक्रम अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरतो. या फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमींसाठी अनेक गोष्टींची मेजवाणी असते.तसंच डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून हा फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. अनेक कलाकार मंडळी सुद्धा या फेस्टिव्हला हजेरी लावतात. दरम्यान, या फेस्टिव्हलला बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) भाऊ सनी कौशलने (Sunny Kaushal) भेट दिली. नुसती भेट न देता अभिनेत्याने 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'मध्ये मातीची भांडी सुद्धा बनवली. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.
यंदाच्या 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'मधील आपला अविस्मरणीय अनुभव सनी कौशलने चाहत्यासोबत शेअर केला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने लिहिलंय की, "पहिल्यांदाच मातीची भांडी करून पाहिली. स्वतःच्या हातांनी काहीतरी तयार करण्याचा आनंद अतुलनीय आहे." सनी कौशलचा हा व्हिडीओ पाहून त्याचं चाहत्यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. शिवाय त्याच्या कलेला देखील त्यांनी दाद दिली आहे.
सनी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच अभिनेता 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात तो तापसी पन्नूने निभावलेल्या राणी या पात्राच्या प्रियकराच्या भूमिकेत पाहायला मिळाला.