Join us
Daily Top 2Weekly Top 5

नियती निष्ठूर झाली! आयुष्यभर साथ देण्याची वचनं दिली अन् काळाने घात केला, पत्नीच्या मृत्यूनंतर ३३ वर्ष एकटा राहिला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:09 IST

शशी कपूर त्यांच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेत राहिले. शशी कपूर यांनी १९५८ मध्ये परदेशी गर्लफ्रेंड जेनिफर केंडलशी लग्न केलं. पण त्याआधी जेनिफरसोबत त्यांची लव्हस्टोरी सुद्धा तेवढीच खास आहे.

Shashi Kapoor: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या रोमॅटिक व सशक्त अभिनयाने तीन दशके सिनेरसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शशी कपूर.वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे भाऊ राज कपूर व शम्मी कपूर यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत अभिनेता बनण्याची इच्छा असणार्‍या शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ साली झाला. शशी कपूर यांना बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. चाळीसच्या दशकात त्यांनी आग आणि आवारा या चित्रपटातून राज कपूर यांच्या लहानपणाची भूमिका साकारली होती.आपल्या अभिनय कारकि‍र्दीत त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले . शशी कपूर त्यांच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेत राहिले. शशी कपूर यांनी १९५८ मध्ये परदेशी गर्लफ्रेंड जेनिफर केंडलशी लग्न केलं. पण त्याआधी जेनिफरसोबत त्यांची लव्हस्टोरी सुद्धा तेवढीच खास आहे. 

करिअरच्या सुरुवातीच्या काळात शशी कपूर यांनी वडीलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये अभिनय व इतर गोष्टींमध्ये हातभार लावण्यास  सुरुवात केली. नाटकांचे विविध ठिकाणी प्रयोग करत असताना शेक्सपियराना या नाट्यकंपनीच्या संचालकांची मुलगी जेनीफर केडील यांच्याशी त्यांचे सूर जुळले. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते, पण जेनिफर नॉर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहालया येऊ लागली. त्यानंतर त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बालीने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले. शम्मी कपूर यांनी वडील पृथ्वीराज कपूर यांची शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. १९५८ साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. 

जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. शशी कपूर यांनी मुंबई ते लंडनमधील डॉक्टरांकडे तिला नेलं. तिच्यावर उपचार केले, मात्र ७ सप्टेंबर १९८४ रोजी जेनिफरचा मृत्यू झाला. यानंतर शशी कपूर यांचं आयुष्या थांबलं. जेनिफरच्या मृत्यूनंतर शशी कपूर यांनी दुसरं लग्न केलं नाही आणि ३३ वर्षे एकटेच राहिले. ४ डिसेंबर २०१७ रोजी शशी कपूर यांचं निधन झालं.त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि संजना कपूर ही मुलगी आहे. 

कारकीर्द 

शशी कपूर यांनी नायक म्हणून यश चोपडा यांच्या धर्मपूत्र या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.त्यानंतर शशी कपूर प्यार किये जा , नींद हमारी ख्वाब तुम्हारे , आमने सामने, कन्यादान , प्यार का मौसम , जहाँ प्यार मिले , बॉम्बे टॉकीज , शर्मिली , दिवार , नाच उठे संसार , जय बजरंग बली , शंकरदादा, कभी कभी , आप बीती, फकिरा या सुपरहिट सदाबहार चित्रपटातून अभिनय केला. दरम्यान, शशी कपूर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे  १९६५ मध्ये आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाने त्यांना रातोरात ते स्टार झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shashi Kapoor: Widowed, never remarried, and lived 33 years alone.

Web Summary : Shashi Kapoor married Jennifer Kendal in 1958. After her 1984 death from cancer, he never remarried. He lived alone for 33 years until his death in 2017, leaving behind children Kunal, Karan and Sanjana.
टॅग्स :शशी कपूरबॉलिवूडसिनेमा