Lootera Re-Release: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गाजलेले सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. हा नवा ट्रेंड आता सुरु झाला आहे. शिवाय जुने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक्क सुद्धा गर्दी करताना दिसत आहेत. अलिकडेच 'सत्या', 'कहो ना प्यार है', 'ये जवानी है दीवानी', 'सनम तेरी कसम' ते 'करण-अर्जुन' हे चित्रपट पुन्ही रिलीज करण्यात आले. इतकंच नाही तर रि-रिलीज झाल्यानंतर हा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आत या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका लूटेरा हा चित्रपट रि-रिलीज करण्यात येत आहे. आता जवळपास १२ वर्षांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे.
नुकतीच पीव्हीआर सिनेमाच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिलंय, “वेळ आली आहे! ७ मार्चपासून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा 'लूटेरा' ची जादू अनुभवा." त्यामुळे सिनेरसिक सुद्धा उत्सुक झाले आहेत. लूटेरा हा चित्रपट बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट येत्या ७ मार्चला पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 'लुटेरा चित्रपट ५ जुलै २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं कथानक त्यातील गाणी तसेच कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांची दाद मिळाली. विक्रमादित्य मोटवानी यांनी 'लुटेरा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. रणवीर सिंगने या चित्रपटात वरुण श्रीवास्तव ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर सोनाक्षी सिन्हाने लेखिका पाखी रॉय चौधरीची भूमिका वठवली आहे.