Arshad Warsi Talk About Her Marriage: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार सापडतील ज्यांची प्रेमकहाणी कोणत्याची चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही.अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अरशद वारसी आणि मारिया. १४ फेब्रुवारी १९९९ रोजी अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी हे दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, सुरुवातीला त्यांच्या या लग्नाला कुटुंबियाचा विरोध होतो. यामागे नेमकं काय कारण होतं. याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला आहे.
अर्शद वारसीने अलिकडेच लल्लन टॉप ला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्याने त्याची प्रेमकहाणी तसेच लग्नाबद्दल सासरच्या मंडळींची काय प्रतिक्रिया होती. याबद्दल सांगितलं. दरम्यान, अभिनेता म्हणाला,"ते थोडे घाबरले होते. मारिया एक कॅथलिक मुलगी आणि मी मुसलमान मुलगा म्हणून. माझे सासू-सासरे दोघेही खूप साधे आहेत. त्यांच्या आयु्ष्यात नेहमी चर्चेमध्ये जाणं आणि अध्यात्माशिवाय दुसरं काहीही नाही. ते थोडे नाराज होते, कारण त्यांना आशा होती की मारिया एका दुसऱ्या कॅथेलिक मुलाशी लग्न करेल, ज्याची ९ ते ५ अशी नोकरी असेल, पण त्याऐवजी तिने एका मुस्लिम मुलाशी लग्न केले, आणि तोही बेरोजगार होता. आमच्या लग्नावेळी ते थोडे नाराज होते, कारण त्यांना आशा होती की मारिया अशा एका कॅथलिक मुलाशी लग्न करेल, जो ९ ते ५ अशी नोकरी करणारा असेल. पण त्याऐवजी तिने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं ज्याच्याकडे काहीच काम नव्हतं."
अर्शनने पुढे सांगितलं की,"त्या वेळीसुद्धा मारियाच्या पालकांना खात्री होती की तो एक चांगला माणूस आहे आणि तो त्यांच्या मुलीची काळजी घेईल. मग त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अर्शद म्हणाला, मला पाहिल्यानंतर कदाचित त्यांना कळलं असावं की हा एक चांगला मुलगा आहे, याचा स्वभाव चांगला आहे. कालांतराने त्यांना जाणवलं, याच्यापेक्षा चांगला कोणीच नाही. आता ते खूप आनंदी आहेत आणि माझ्यासोबत राहतात."
फिल्मी आहे लव्हस्टोरी...
अर्शदची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी इंटरेस्टिंग नाही. डान्स ग्रूप चालवत असताना मारिया नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि हीच मारिया त्याची आयुष्यभराची जोडीदार बनली.
Web Summary : Arshad Warsi revealed his interfaith marriage with Maria initially worried her parents. They hoped for a Catholic groom with a stable job. However, they eventually accepted Arshad, recognizing his good nature and now live happily with them.
Web Summary : अरशद वारसी ने बताया कि मारिया के साथ उनके अंतरधार्मिक विवाह को लेकर शुरुआत में उनके माता-पिता चिंतित थे। वे एक स्थिर नौकरी वाले कैथोलिक दूल्हे की उम्मीद कर रहे थे। हालाँकि, उन्होंने अंततः अरशद को स्वीकार कर लिया, उनके अच्छे स्वभाव को पहचाना और अब खुशी से उनके साथ रहते हैं।