Diljit Dosanjh: लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)त्याच्या साधेपणाने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. आपल्या अभिनयासह तो गायनानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो आहे. दिलजीतची सध्या भारतात 'दिल लुमिनाती टूर' सुरू आहे. देशभरात विविध ठिकाणी तो लाईव्ह कॉन्सर्ट करतो आहे.जगभरातील चाहत्यांकडून दिलजीतच्या या कॉन्सर्टला प्रेम मिळते आहे. तरुणाईमध्ये त्याची वेगळीच क्रेझ आहे. तरुणांईच्या भावनांना साद घालणारी तसेच थिरकायला लावणारी अशी गाणी तो तयार करतो. दरम्यान, सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे त्याचे चाहतेही चिंतेत आहेत.
दिलजीत दोसांझ अहमदाबाद येथे लाईव्ह कॉन्सर्ट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परफॉर्मन्स करताना दिलजीतचा तोल जाऊन स्टेजवर कोसळला. पण, प्रसंगावधान दाखवत तो लगेच उभा राहतो. त्यावेळी 'पटियाला पेग' हे गाणं तो गात होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उत्साहामध्ये अभिनेता गायन करत असताना मध्येच नाचताना देखील दिसतोय.
व्हिडीओमध्ये मल्टि टास्किंग करण्याचा नादात दिलजीतचा तोल जाऊन तो स्टेवर पडतो. सुदैवाने दिलजीतला कोणतीही दुखापत झालेली नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये पंजाबी लूक करून तयार झालेला पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये दिलजीत कॉन्सर्टच्या ऑर्गनायझरला "तुम्ही ठेवलेल्या फायर बॉक्समुळे इथे तेल सांडलं आहे, कृपया असं करू नका" असं तो म्हणतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.