Join us
Daily Top 2Weekly Top 5

रशियात राहते ईशा गुप्ताची ‘डुप्लिकेट’, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 08:00 IST

हिला पाहाल तर ‘असली नकली’मधला फरक विसराल...

ठळक मुद्देईशाप्रमाणेच व्हिक्टोरियाही स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करते. तिचे अख्खे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. 

सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेली ईशा कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. ईशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा वादात सापडली. सावळ्या रंगावरून अनेकदा ती लक्ष्य झाली. पण बिनधास्त ईशाने कधीच या टीकेची पर्वा केली नाही. बोल्ड फोटो शेअर करत चर्चेत राहण्याचे तिचे प्रयत्न कुठल्याही टीकेने थांबले नाहीत. अर्थात आज आम्ही ईशाच्या बोल्ड फोटोंबद्दल नाही तर तिच्यासारख्याच हुबेहुब दिसणा-या तिच्या डुप्लिकेटबद्दल सांगणार आहोत. होय, ईशाची ही डुप्लिकेट आहे ती रशियाची. व्हिक्टोरिया ओडिंटकोवा तिचे नाव.

व्हिक्टोरिया ही एक रशियन मॉडेल आहे. तिचे आणि ईशाचे फोटो पाहिल्यानंतर दोघींमध्ये कोण ईशा अन् कोण व्हिक्टोरिया ओळखणे कठीण होईल.

ईशाप्रमाणेच व्हिक्टोरियाही स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करते. तिचे अख्खे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. अनेकदा न्यूड फोटोशूटमुळेही ती चर्चेत आली आहे.

तेव्हा पाहा, व्हिक्टोरियाचे काही खास फोटो...

टॅग्स :ईशा गुप्ता