Join us

'ही' बोल्ड अँड हॉट अभिनेत्री करतेय बॉईजमधून सिल्वर स्क्रिनवर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 16:10 IST

सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंसोबत ‘बालपण देगा देवा’ ह्या मालिकेत दिसलेली शुभांगी तांबाळे आता बॉईज-2 सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करतेय.

ठळक मुद्देशुभांगी तांबाळे आता बॉईज-2 सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करतेय

सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंसोबत ‘बालपण देगा देवा’ ह्या मालिकेत दिसलेली शुभांगी तांबाळे आता बॉईज-2 सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करतेय. आपल्या पदार्पणातच एका बोल्ड भूमिकेत दिसणारी शुभांगी म्हणते, “महाविद्यालयीन विश्वातल्या ह्या कथेत संपूर्ण कॉलेजला वेड लावणारी एक मुलगी येते. जिचे नाव असते स्वाती शिंदे. ही स्वाती तिच्या रूपाने आणि हॉटनेसने अख्या कॉलेजच्या मुलांना आपल्यामागे गोंडा घाळवायला भाग पाडत असते. अख्ख्या कॉलेजच्या ‘दिल की धडकन’ असलेली स्वाती बॉईजच्या विश्वात आल्यावर काय धमाल उडते, ते तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल.”

शुभांगी आपल्या हॉट आणि सेन्शुअस लूकबद्दल पूढे सांगते, “बॉईज हा असा सिनेमा होता, ज्याने अख्या महाराष्ट्रातल्या युवापिढीला वेडं लावलं, अशा सिनेमाच्या फ्रॅचाईजीमधून पदार्पण होणं, ही निश्चितच कोणत्याही कलाकारासाठी आनंदाची गोष्ट आहे. बोल्डनेस हा अभिनयाचाच एक भाग आहे. आणि माझी भूमिका रंगवताना तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न मी केला आहे.”  बॉईजना आपल्या अदांनी वेड लावणारी स्वाती आता अख्या महाराष्ट्राला वेड लावणार हे निश्चितच.

महाविद्यालयीन जीवनातील भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, ह्रशिकेश कोळीचे संवादलेखन त्याला लाभले आहे. तसेच, सुपरहिट 'बॉईज'चा हा दर्जेदार सिक्वेल घेऊन येण्यासाठी, सिनेमाचे निर्माते लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी मेहनत घेतली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे हा चित्रपट जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार आहे. 

टॅग्स :बॉईज २