Join us

RRR Box office collection: ब्लॉकबस्टर! ‘आरआरआर’ 500 कोटींपार...; ‘द काश्मीर फाईल्स’चा मोडला रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:15 IST

RRR Box office collection: सिनेमा रिलीज होऊन काल 4 दिवस झालेत आणि या चारच दिवसांत ‘आरआरआर’ सिनेमा 500 कोटी क्लबमध्ये सामील झाला.

RRR Box office collection:  एस.एस. राजमौलींच्या ‘आरआरआर’  (RRR) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरनुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा रिलीज होऊन काल 4 दिवस झालेत आणि या चारच दिवसांत ‘आरआरआर’ सिनेमा 500 कोटी क्लबमध्ये सामील झाला. होय, काल रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी सिनेमानं छप्परफाड कमाई केली.

तीनच दिवसांत रेकॉर्डब्रेक25 मार्च ते 28 मार्च या चार दिवसांत ‘आरआरआर’ने वर्ल्डवाईड 537 कोटींचा बिझनेस केला आहे. पहिल्याच आठवड्यात केवळ तीनच दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक वर्ल्डवाईड बिझनेस करून ‘आरआरआर’ने इतिहास रचला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने वर्ल्डवाईड 257.15 कोटींचा बिझनेस केला होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 114.38 कोटींचा गल्ला जमवला, रविवारी तिसऱ्या दिवशी 130 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी या कमाईत आणखी भर पडली आणि वर्ल्डवाईड कमाईचा आकडा 537 कोटींवर पोहोचला.

हिंदी व्हर्जनने चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काल सोमवारी म्हणजेच रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने 17 कोटींची कमाई केली आणि याचसोबत एकूण कमाईचा आकडा 92 कोटींवर पोहोचला. लवकरच हा सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.

‘द काश्मीर फाईल्स’चा मोडला रेकॉर्ड‘आरआरआर’ने ‘द काश्मीर फाईल्स’चा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारच्या कमाईचा रेकॉर्ड आरआरआरने मोडला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने  पहिल्या सोमवारी 15.10 कोटींचा बिझनेस केला होता. तर ‘आरआरआर’ने पहिल्या सोमवारी 17 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :आरआरआर सिनेमाराम चरण तेजाएस.एस. राजमौली