Join us

Blackbuck Poaching Case : सलमान खानच्या शिक्षेवर 'या' अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 12:41 IST

पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराने अशाप्रकारे जाहीरपणे सलमानच्या शिक्षेवर आनंद व्यक्त केलाय. सोफियाने सोशल मीडियात याबाबत एक पोसट लिहिली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी झालेल्या शिक्षेवर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि काही बॉलिवूड कलाकारांमध्ये नाराजी आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात या निकालावर चांगलीच खुश झाली आहे. पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराने अशाप्रकारे जाहीरपणे सलमानच्या शिक्षेवर आनंद व्यक्त केलाय. सोफियाने सोशल मीडियात याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. 

सलमान खानचा फोटो शेअर करत सोफियाने लिहिले की, शेवटी आपलं कर्म आपल्याला पकडतंच. अनेक लोक सलमान विरोधात बोलायला घाबरतात. कारण त्यांना वाटतं की, सलमान बॉलिवूड कंट्रोल करतो. पण मी बोलायला नाही घाबरत. मला आनंद आहे की, सलमान खानने जे केलं त्यासाठी त्याला तुरुंगात जावं लागलं. या जमिनीसाठी जनावरं खूप गरजेचे आहेत. मोठ्या प्रमाणात तरुण सलमान खानला फॉलो करतात. त्यामुळे त्यांच्याप्रती सलमानची जबाबदारी अधिक आहे. त्यांना असे काम करुन जगाला काय दाखवायचे आहे. या पोस्टमध्ये तिने पुढेही खूपकाही लिहिली आहे.

सोफियाने तिचा एक अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, असे माझ्यासोबतही झाले आहे. अरमान कोहलीने माझ्या दोन वकिलांना विकत घेतले आणि ती केस तिथेच बंद झाली. डॉली बिंद्राने मला हेही सांगितले की, अरमानची फॅमिली खूप शक्तीशाली आहे. ते एअरपोर्टवर तुझ्या बॅगमध्ये ड्रग्स ठेवू शकतात. ज्यासाठी मला तुरुंगातही जावं लागलं असतं. त्यामुळे मी केस मागे घेतली. याबाबतही तिने खूपकाही लिहिले आहे.

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण