मनीष पॉल हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणारा या हरहुन्नरी अभिनेत्याचा (3 ऑगस्ट) आज वाढदिवस. 3 ऑगस्ट 1981 रोजी मुंबईत मनीषचा जन्म झाला. पण त्याचे अख्खे बालपण दिल्लीत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.
स्टार वन वाहिनीवरील ‘घोस्ट बना दोस्त’ या मालिकेत मनीषने भूताची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘जिंदादिल‘, ‘श२२२२ फिर कोई है’,‘कहानी शुरू विथ लव गुरू’ या मालिकांमध्ये अभिनय केला. लवकरच त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. अक्षय कुमार आणि कतरीना कैफ स्टारर ‘तीस मार खान’ तो झळकला. 2013 मध्ये ‘मिकी वायरस’ या सिनेमात तो लीड हीरो म्हणून तो दिसला.
संघर्षाच्या काळात संयुक्ता मनीषच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. एकदा मनीष याबद्दल बोलला होता. ‘माझी पत्नी माझा आदर्श आहे. आज मी जे काही आहे, ते तिच्यामुळे. लग्नानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तिने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जेणेकरून मी माझे करिअर करू शकेल,’ असे तो म्हणाला होता.