Join us

Birthday Special : ‘या’ विचित्र मागणीने जाम भडकली होती प्राची देसाई, स्वत:ला घेतले होते व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते कोंडून!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 08:00 IST

एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि पुढे बॉलिवूड अभिनेत्री बनून प्रेक्षकांच्या मनावर ‘राज’ करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देबालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम से' या मालिकेमुळे प्राची घराघरांत पोहोचली. तीन बहिणींवर आधारित या मालिकेत प्राचीने बानी हे पात्र साकारले होते.

एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि पुढे बॉलिवूड अभिनेत्री बनून प्रेक्षकांच्या मनावर ‘राज’ करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिचा आज वाढदिवस.मराठमोळ्या प्राचीने 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन’मध्ये ती झळकली आणि यानंतर प्राचीने कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात तिने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर लाईफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तेरी मेरी कहानी, बोल बच्चन, पुलिसगिरी, आय मी और मैं अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.

बॉलिवूडमध्ये प्राचीने दशकभराचा काळ पूर्ण केला. या काळात  वादही तिने ओढवून घेतले. ‘एक विलेन’ या चित्रपटाच्या सेटवरच्या एका वादामुळे प्राची चांगलीच चर्चेत आली होती. या चित्रपटात प्राचीने एक आयटम साँग केले होते.

इंडिया टुडने दिलेल्या वृत्तानुसार, या आयटम नंबरच्या शूटींगवेळी प्राची जाम भडकली होती. याचे कारण म्हणजे, या गाण्याच्या क्रिएटीव्ह टीमने प्राचीला बे्रस्टमध्ये सिलिकॉन पॅड वापरण्यास सांगितले होते. या गाण्यात प्राची अधिकाधिक बोल्ड दिसावी, यासाठी  क्रिएटीव्ह टीमने प्राचीला सिलिकॉन पॅड वापरण्याचा सल्ला दिला होता. पण प्राची सिलिकॉन पॅड वापरण्याच्या सल्लयाने जाम भडकली होती. इतकी की, तिने स्वत:ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद केले होते.

माफी मागेपर्यंत मी गाणे शूट करणार नाही, अशी अट तिने ठेवली होती. तिच्या या वागण्यामुळे सेटवरचे वातावरण इतके तापले होते की, अखेर चित्रपटाची निर्माती एकता कपूरला सेटवर बोलवण्यात आले. तिने समजवल्यानंतर कुठे प्राचीने या गाण्याचे शूट पूर्ण केले होते.

टॅग्स :प्राची देसाई