Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच चर्चेत राहिला आदित्य पांचोली, एकेकाळी पूजा बेदीसोबतही होता नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 10:50 IST

अभिनेता आदित्य पांचोलीचा आज वाढदिवस

ठळक मुद्दे1986 साली ‘कलंक का टीका’ या सिनेमाच्या सेटवर आदित्याची जरीना वहाबसोबत भेट झाली. या सिनेमाच्या सेटवरच दोघे प्रेमात पडले आणि त्याचवर्षी दोघांनी लग्नही केले.

आदित्य पांचोली बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. एक लीड अ‍ॅक्टर म्हणून त्याचे फिल्मी करिअर फार कमाल दाखवू शकले नाही. मात्र त्याच्या निगेटीव्ह रोलची चर्चा झाली. पर्सनल लाईफमधील कॉन्ट्रोव्हर्सीमुळे तो त्यापेक्षाही अधिक चर्चेत राहिला. कंगना राणौतसोबतचे त्याचे रिलेशनशिपमुळे तर तो चर्चेत राहिलाच. पण अभिनेत्री पूजा बेदी हिच्यासोबतच्या त्याच्या अफेअरचीही प्रचंड चर्चा झाली होती.

जरीनासोबत लग्न

1986 साली ‘कलंक का टीका’ या सिनेमाच्या सेटवर आदित्याची जरीना वहाबसोबत भेट झाली. या सिनेमाच्या सेटवरच दोघे प्रेमात पडले आणि त्याचवर्षी दोघांनी लग्नही केले. जरीनाची आई या लग्नाच्या विरोधात होती. पण जरीनाने आईच्या विरोधात जाऊन आदित्यशी लग्न केले. दोघांना सूरज व सना अशी दोन मुले झालीत.

लग्नानंतर पडला पूजाच्या प्रेमात

लग्नानंतर काही वर्षांनी अचानक आदित्य व जरीना यांच्यातील कुरबुरींची चर्चा सुरू झाली. पूजा बेदी आधीपासून आदित्यची चांगली मैत्रिण होती. मात्र पत्नीसोबत मतभेद निर्माण झाल्यानंतर आदित्य पूजाकडे आकर्षित झाला. दोघांची जवळीक वाढू लागली. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. सूत्रांचे मानाल तर, या डेटींगदरम्यान पूजा बेदीच्या मोलकरणीने आदित्यवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. यानंतर आदित्य व पूजाचे मार्ग बदलले. मात्र हा काळ पूजासाठी खूप कठीण होता. पूजाने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. आदित्य मला टाळू लागला होता. त्याने माझ्याशी बोलणे बंद केले. कदाचित त्याला त्याच्या पत्नीकडे परत जायचे होते. अखेर मी या नात्यातून बाहेर पडले. एका अयशस्वी नात्यासाठी मी स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नव्हते, असे पूजा म्हणाली होती.

कंगनासोबत नाते...

पुढे आदित्य व कंगना राणौत यांच्या नात्याचा अध्याय रंगला. स्वत:पेक्षा वयाने 21 वर्षांनी लहान असलेल्या कंगनासोबत आदित्य रिलेशनशिपमध्ये होता. कंगना आणि मी अगदी पती-पत्नीसारखे राहायचो, असे आदित्यने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. याऊलट कंगनाने मात्र वडिलांच्या वयाच्या आदित्य पांचोलीने तिला घरात कैद करून ठेवल्याचे म्हटले होते. स्वत:ला वाचवण्यासाठी फर्स्ट फ्लोअरच्या खिडकीतून तिने खाली उडी मारली होती. इतकेच नाही तर आदित्यची पत्नी जरीनाकडे तिने मदतही मागितली होती, असेही कंगनाने सांगितले होते. पण जरीनाने मदत करायला नकार दिला. जेव्हा काहीही पर्याय राहिला नाही तेव्हा ती पोलिसांकडे गेली.कंगनाच्या या वक्तव्यावर आदित्यने तिला पागल म्हटले होते. तसेच तिच्या विरोधात कायदेशीर कारवाईच्या पयार्याचा विचार करणार असल्याचेही म्हटले होते. 

टॅग्स :आदित्य पांचोली