Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे अबराम खानचा पण, चर्चा छोट्या नवाब तैमूरची, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:46 IST

करीना कपूर खान व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टारकिड आहेत.

करीना कपूर खान व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टारकिड आहेत. तैमूरचे फॅन फॉलोविंग मोठ्या स्टार्सवर देखील मात करतात. तसेच तेैमूरचा एखादा फोटो समोर आला की तो लगेच व्हायरल होतो. आता नुकताच तैमुरचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो टॅटू बनवताना दिसतो आहे.

खरेतर तैमूरचा हा फोटो शाहरूख खानचा मुलगा अबराम खानच्या बर्थडे पार्टीतील आहे. या बर्थ डे पार्टीला तैमूर पाहुणा म्हणून गेला होता. अबरामच्या बर्थ डे पेक्षा तैमूरचीच जास्त चर्चा होताना दिसते आहे. या बर्थ डे पार्टीत तैमूरने पिंक रंगाचा शर्ट व नीळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. या बर्थडे पार्टीत तैमूरने टेम्पररी टॅटू काढताना दिसला.

अबराम खानचा सहावा वाढदिवसाची पार्टी शाहरूख व गौरी खान यांनी अॅवेंजर्स थीमवर आयोजित केली होती. ही पार्टी ताज लँड्स एण्डमध्ये ठेवली होती. 

सध्या तैमूर सैफ व करीनासोबत लंडनमध्ये गेला आहे. नुकतेच करीनाने तैमूरचा डाएट प्लानबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, तैमूर फक्त आणि फक्त घरचेच पदार्थ खातो. त्याला बाहेरचे जेवण दिले जात नाही. डाएटीशियन रुजुता दिवेकरला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की, तैमूरला बर्थ डे पार्टीत खाण्याची परवानगी नाही. तो फक्त घरचेच खातो. इतकेच नाही तर करीना दर महिन्याला तैमूरचा डाएट प्लान बनवते आणि त्याच फळे व भाज्यांचा समावेश असतो. तैमूरदेखील हे पदार्थ खायला कंटाळा करत नाही. 

टॅग्स :तैमुरअबराम खानशाहरुख खानकरिना कपूरसैफ अली खान गौरी खान