Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss OTT 3 :'लेस्बियन' आहेत पायल अन् कृतिका मलिक ? पोलोमी दासने केला धक्कादायक खुलासा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:38 IST

विशेष म्हणजे सर्वात चर्चेत यंदा बिग बॉसमध्ये मलिक कुटुंबच आहे.

'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चर्चेत आहे. या पर्वात आपल्या दोन पत्नीसह अरमान मलिक हा सहभागी झाला होता. मात्र, पायल मलिक ही काही दिवसांपुर्वीच बेघर झालीये. सध्या बिग बॉसच्या घरात अरमान आणि कृतिका आहेत. विशेष म्हणजे सर्वात चर्चेत यंदा बिग बॉसमध्ये मलिक कुटुंबच आहे. अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींमध्ये कमालीचं बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. पण, सोशल मीडियावर त्या दोघांनी काही नेटकऱ्यांनी 'लेस्बियन' म्हटलं. आता बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली स्पर्धक पौलोमी दासने यावर भाष्य केलं आहे. 

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जे स्पर्धक नॉमिनेट झाले, त्यामधून पौलोमी दास बेघर झाली आहे. घराबाहेर येताच पौलोमी दास विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच तिनं filmymantramedia मुलाखत दिली. तिची ही मुलाखत व्हायरल होत आहे. पौलोमीला Filmymantramedia शी बोलताना विचारण्यात आलं की, पायल मलिक आणि कृतिका मलिक लेस्बियन आहेत का? यावर पौलोमीने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. 

पायल मलिक आणि कृतिका मलिक लेस्बियन नसल्याचं तिनं सांगितलं. पौलोमी म्हणाली, "असं काही नाही. त्या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या सोबती आहेत". यानंतर तिला विचारलं की, "अशी नाती समाजासाठी चांगली असतात का?' यावर पौलोमी म्हणते, "मला माहित नाही. मीच पहिल्यांंदा असं काही पाहिलं आहे". या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका  या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांची खरी ओळख ही युट्यूबर म्हणून आहे. त्यांनी युट्यूबर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांचे व्लॉग्स आजही प्रेक्षक पाहताना दिसतात. अरमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.  २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होतं. त्यांना चिरायू नावाचा मुलगा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं. अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडियायु ट्यूब