Join us

Bigg Boss OTT 2 : नवाजुद्दीनची माजी पत्नी आलियाचं भंगलं स्वप्न, पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 13:53 IST

Aaliya Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी मोठ्या अपेक्षांसह 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये दाखल झाली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui)ची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) मोठ्या अपेक्षांसह 'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) मध्ये दाखल झाली होती. तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती आणि करिअर करायचे होते. पण तिच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. तिला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. या आठवड्यासाठी, जिया शंकर आणि आलिया सिद्दीकी यांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. या आठवड्याच्या शेवटी इविक्शन होणार होते. पण बिग बॉसने मिड-वीक इव्हिकशनचा ट्विस्ट आणून सर्वांना आश्चर्यचकित केले. बिग बॉसने सांगितले की, प्रेक्षकांच्या मताच्या आधारे स्पर्धकांपैकी एकाला बाहेर काढले जाईल.

जिया शंकर आणि आलिया सिद्दीकीपैकी आलियाला प्रेक्षकांची कमी मते मिळाली. यामुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. आलियाने 'बिग बॉस OTT २' मध्ये रोलर-कोस्टर राईड केली आहे. ती एक मजबूत स्पर्धक मानली जात असताना, ती निर्भय असेल. पण ती स्वतःमध्ये हरवलेली असायची. आलिया सिद्दीकीचे अभिषेक मल्हान, मनीषा राणी आणि आकांक्षा पुरीसोबत चांगले बॉन्डिंग आहे. बेबिका धुर्वे यांच्यापासून अंतर ठेवले होते. याशिवाय ती पूजा भटसोबत वाद घालतानाही दिसली. 

पूजा भट आलियावर वैतागली होतीपूजा आलियावर नवाजुद्दीन सिद्दीकी, मुले आणि घटस्फोट याविषयी पुन्हा पुन्हा बोलत असल्यामुळे भडकली होती. स्वत: पूजा भटचाही घटस्फोट झाला आहे. तिने आलियाला सांगितले की फक्त तिच घटस्फोटित नाही तर तीदेखील घटस्फोटितही आहे. आयुष्यात पुढे जायला हवे. आलिया आणि पूजाच्या भांडणानंतरच आलिया सिद्दीकीचे एलिमिनेशन झाले आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी