'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरसवानी हिचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीला बॉयफ्रेंड रोहन खन्नाने तुर्कीमधील कप्पाडोसिया येथे फिल्मी स्टाइमलमध्ये प्रपोज केलं. रोहनने पलक पुरसवानीला लग्नाची मागणी घातली आहे. बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्यानंतर अभिनेत्रीही भारावून गेली. तिने तिच्या सोशल मीडियावरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत बर्फाच्छादित प्रदेशात रोहनने पलकसाठी खास सरप्राइज प्लॅन केल्याचं दिसत आहे. तिथेच तो तिला लग्नाची मागणी घालतो. त्याबरोबरच हिऱ्याची अंगठी घालत पलकला प्रपोज करत असल्याचं दिसत आहे. पलक आणि रोहनचा हा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी पलकला शुभेच्छा दिल्या आहेत.
पलक बिग बॉस ओटीटी २मध्ये सहभागी झाली होती. तिचा अभिनेता अविनाश सचदेव याच्यासोबत साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणांमुळे त्यांचं लग्न मोडलं. बिग बॉस ओटीटी २मध्ये पलक आणि अविनाश यांच्यात अनेकदा खटकेही उडाल्याचे दिसले. आता पलकला पुन्हा तिचं प्रेम मिळालं आहे. रोहनसोबत ती नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे.