Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi S6: रोशन भजनकर बिग बॉसमधून एलिमिनेट झाल्याची चर्चा, प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:24 IST

आपल्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या रोशन भजनकरचा बिग बॉसमधील प्रवास इथेच संपणार असल्याची शक्यता आहे.

'बिग बॉस मराठी'सीझन ६ च्या सातव्या आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख ते नाव जाहीर करणार आहे. होय, यावेळी रविवारी नाही तर आज शनिवारीच एलिमिनेशन होणार आहे. कोणता स्पर्धक घराबाहेर होणार याचं नाव रितेश सांगणार आहे. राकेश बापट, राखी सावंत, प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर हे चार सदस्य नॉमिनेशनमध्ये आहेत. यात रोशन भजनकर घराबाहेर जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आपल्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या रोशन भजनकरचा बिग बॉसमधील प्रवास इथेच संपणार असल्याची शक्यता आहे. कलर्स मराठी वाहिनीने प्रसारित केलेल्या नवीन प्रोमोमध्ये रितेश देशमुख एलिमिनेशन उद्या नाही तर आजच होणार असं सर्व सदस्यांना सांगतो. यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. कोण एलिमिनेट होईल एक नाव सांगा असं तो म्हणतो. तेव्हा प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत रोशनचं नाव घेतात. तर राकेश बापट प्राजक्ता वाटतीये असं बोलतो. दुसरीकडे रोशन स्वत:चंच नाव घेतो. 'मीच होऊ शकतो' असं तो म्हणतो. \

या प्रोमोवर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'रोशन इथेही स्वत:साठी स्टॅण्ड घेऊ शकत नाहीये' अशी कमेंट एकाने केली आहे. काहींनी 'प्राजक्ताला बाहेर काढा' असं मत व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी रोशनचंच नाव घेतलं आहे.

लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री

सोबतच बिग बॉसमध्ये येत्या आठवड्यात तीन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. हिंदी इंडस्ट्रीतील अभिनेत्री रेवा कौरसे बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. तसंच संकेत पाठक आणि संस्कृती साळुंखे यांचीही नावं समोर आली आहेत. यामुळे आता बिग बॉसच्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi S6: Roshan Bhajanakar likely eliminated; promo viral.

Web Summary : Roshan Bhajanakar is likely to be evicted from Bigg Boss Marathi S6 this week. A promo shows contestants naming Roshan for elimination. Wildcard entries are expected soon, including Reva Kaurase, Sanket Pathak and Sanskruti Salunkhe.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६कलर्स मराठीटेलिव्हिजन