Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपला मुलगाच जिंकला पाहिजे! सूरजला राखी सावंतचा फूल सपोर्ट, खास मराठीतून शेअर केला व्हिडिओ, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:04 IST

सूरजला सपोर्ट करण्यासाठी राखी सावंत मैदानात, चाहत्यांना केलं मत देण्याचं आवाहन.

Rakhi Sawant Video : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान, या सीझनमध्ये 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण त्याच्या खेळीबरोबरच  साध्या-भोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. दरम्यान, अशातच मागील आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री झाली होती. राखी स्पर्धक नाहीतर फक्त काही वेळासाठी या शोमध्ये सहभागी झाल्याची पाहायला मिळाली, दरम्यान, आता  राखी सावंतनेसोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

'ड्रामा क्वीन' राखी सावंतने सोशल मीडियावर सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना सूरजला मत देण्याचं आवाहन केलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये राखी म्हणते, "नमस्कार! तुम्ही सगळे कसे आहात. अलिकडेच मी बिग बॉस मराठीमध्ये गेले होते. तिथे खूप मजा आली. पण, मला आता असं वाटतंय की सूरज चव्हाणच जिंकणार आहे. तोच ट्रॉफी घेणार आणि सूरजच जिंकून येणार! मला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगायचं आहे की, सूरज चव्हाणला वोट करा, भरपूर वोट करा. आपला मुलगा जिंकून आला पाहिजे". 

पुढे राखी म्हणते, "ज्या पद्धतीने तो एखाद्या माणसाशी बोलतो, त्याची ती पद्धत मला आवडते. सूरज पाण्यासारखा निर्मळ आहे. मला या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांनी सूरजला वोट करा, असं सांगायचं आहे. सूरज, तेरा सूरज कभी नहीं डूबेगा और तू जितेगा" असं म्हणत राखीने व्हिडीओचा शेवट केला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीराखी सावंतटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल