Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात दिवसेंदिवस नवी समीकरणं तयार होत असल्याचं दिसत आहे. खेळ जसजसा पुढे जातोय तसंतसं घरातील सदस्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. टोळीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे घरात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यामधील मैत्री घट्ट होत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर तन्वी आणि राकेशने रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
तन्वी आणि राकेशने रोमँटिक डान्स केल्यामुळे राखीचा पारा चढला. राखीला डिवचण्यासाठी राकेशने पुन्हा तन्वीला तिच्यासमोरच गालावर किस केलं. ते पाहून राखी आणखी भडकली आणि तिने थेट स्वत:चे केसच कापले. पण या संपूर्ण प्रकरणामुळे राकेश बापट मात्र चांगलाच ट्रोल होत आहे. राकेशने तन्वीसोबत केलेलं वर्तन पाहून चाहते चांगलेच भडकले आहेत. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या बिग बॉसच्या घरातील या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
"बिग बॉसच्या घरातला इमरान हाश्मी राकेश", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्या युजरने "शोची काय लेव्हल सुरू आहे", असं म्हटलं आहे. "बहीण भाऊ म्हणतात आणि असं वागतात...बिग बॉससाठी काय काय करतील", "आता तन्वीच्या घरचे बघत नसतील ना", "हा शो बंद झालेला बरा", "तन्वीला असेच अँगल बनवायचे असतात", अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Web Summary : Raqesh Bapat's actions with Tanvi Kolte on Bigg Boss Marathi 6 drew criticism. After a romantic dance, he kissed her, provoking Rakhi Sawant and angering viewers. He's been compared to Emraan Hashmi.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट और तन्वी कोलते के रोमांस पर विवाद। रोमांटिक डांस के बाद किस करने पर राखी सावंत भड़कीं और दर्शकों ने राकेश को ट्रोल किया। उन्हें इमरान हाशमी बताया गया।