Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यावर पुष्कर जोगने सुरू केले हे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 08:00 IST

बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे अनेक सिझन प्रचंड हिट झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या यशानंतर हा कार्यक्रम विविध भाषांत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य भाषेनंतर बिग बॉस कार्यक्रम प्रेक्षकांना मराठी भाषेत पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचा पहिला सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद मेघा धाडेला मिळाले तर पुष्कर जोग या कार्यक्रमाचा उपविजेता ठरला. हा कार्यक्रम संपल्यानंतर आता सगळेच स्पर्धक आपापल्या कामाला लागले आहेत. अनेकांनी चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहाताच तो डबिंग स्टुडिओत काढला असल्याचे लगेचच लक्षात येत आहे. त्याने या फोटोसोबत मी परत कामाला लागलो आहे. ती आणि ती या माझ्या चित्रपटासाठी मी नुकतेच चित्रीकरण केले असून पुढील अपडेट तुम्हाला लवकरच देईन असे लिहिले आहे.

पुष्करचा ती आणि ती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मृणाल कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून असल्याने त्याला त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण, डबिंग यांना वेळ देता आला नव्हता. पण आता तो त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे देत आहे. त्यामुळे पुष्कर प्रेक्षकांना लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती आणि ती या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहाणार यात काही शंकाच नाही. 

 

टॅग्स :पुष्कर जोगबिग बॉस मराठी