Join us  

फोटोतील 'या' लहानग्याला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी' गाजवून थेट मिळाली सिनेमात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 11:48 AM

Marathi actor: लहानपणी दिसणारा एक साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक त्याचं हे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन चर्चेत येत आहे.

सध्याचा काळ हा समाजमाध्यमांचा आहे त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर, काही वेळा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.  यामध्येच एका अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत येत असून त्याने 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व गाजवलं आहे. इतकंच नाही तर आता त्याच्याकडे सिनेमांच्या रांगाही लागल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या बालपणीचा फोटो आणि आताचा फोटो अशा दोन फोटोंचा कोलाज करुन एक रील शेअर केलं आहे. त्याचा then & now असा फोटो पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेला फोटा अभिनेता आणि 'बिग बॉस ३'चा विजेता विशाल निकम याचा आहे. विशाल सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. विशालने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये त्याला ओळखणंही अनेकांना कठीण झालं आहे. विशेष म्हणजे लहानपणी दिसणारा एक साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक त्याचं हे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन चर्चेत येत आहे.

दरम्यान, 'बिग बॉस' व्यतिरिक्त विशालने 'साताजन्माच्या गाठी', 'दख्खनचा राजा जोतिबा', 'जय भवानी जय शिवाजी', 'आई मायेचं कवच' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच 'बलोच', 'मिथून', 'धुमस' या सिनेमातही तो झळकला आहे.

टॅग्स :विशाल निकमबिग बॉस मराठीमराठी अभिनेताटेलिव्हिजनसिनेमा