Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावंच लागतंय! 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार सूरज चव्हाण? म्हणाला, "माझी बायको..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:12 IST

लग्नानंतर आता बायकोसोबत कुठे फिरायला जाणार? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला.

'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन चांगलाच गाजतोय. रील स्टार्स, कलाकार, इन्फ्लुएन्सर, डान्सर्स अशी मंडळी या सीझनमध्ये आली आहे. गेला सीझनही तुफान गाजला होता. सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. यामुळे सूरज स्टार झाला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच थाटात लग्नही केलं. आता सहाव्या सीझनमध्ये सूरज बायकोसोबत बिग बॉसमध्ये येणार का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिलं आहे.

सूरज चव्हाणची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाने सर्वांचंच मन जिंकलं आहे. यामुळेच लोकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे सूरजला बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली. आता बिग बॉसचा नवा सीझन सुरु आहे. यामध्ये सूरजला गेस्ट म्हणून येण्याची ऑफर मिळाली आहे.  चांगभलं न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सूरज म्हणाला, "जायचंच की..बोलवलंय म्हणल्यावर जायला लागणार. गेस्ट म्हणून जाणार. माझी बायको तर खूप उत्सुक आहे. मी आज जो आहे टॉपचा किंग तो महाराष्ट्रामुळेच...त्यांनी मला डोक्यावर घेतलंय आणि स्टार बनवलंय. मी महाराष्ट्राचे मनापासून आभार बनतो. आई बहि‍णींनी, भावांनी इतका पाठिंबा दिला म्हणूनच  मी स्टार बनलो."

लग्नानंतर आता बायकोसोबत कुठे फिरायला जाणार? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा त्याने दुबईला जाण्याची इच्छा व्यक्त केली. सूरजचं नवीन घराचं स्वप्न त्याने बिग बॉसमध्ये बोलून  दाखवलं होतं. आज तेच स्वप्न त्याचं पूर्ण झालं आहे. लग्नाआधीच गावी त्याचा नवीन बंगला बांधून पूर्ण झाला आणि त्याने नव्या घरातच बायकोचं स्वागत केलं. अतिशय थाटात त्याचा लग्नसोहळा पार पडला होता. या सोहळ्याला धनंजय पोवार, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर यांनी हजेरी लावली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Suraj Chavan of Bigg Boss Marathi 6 to Enter with Wife?

Web Summary : Bigg Boss Marathi winner Suraj Chavan may enter the show as a guest. He expressed gratitude to his fans. He also shared his desire to travel to Dubai with his wife and his joy at fulfilling his dream of building a new house.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६रितेश देशमुखटिव्ही कलाकारकलर्स मराठी