Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता शुक्रेच्या प्रेमात पडलाय करण सोनावणे? गायिकेला म्हणाला- "मला पहिल्यांदाच कोणाबद्दल तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:48 IST

रुचिताने विशालबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर आता करण सोनावणेनेही सिंगर प्राजक्ता शुक्रेला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे करण प्राजक्ताच्या खरंच प्रेमात पडलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Bigg Boss Marathi 6: नेहमी भांडण तंटे आणि वादावादी सुरू असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरात आता प्रेमाचे वारे वाहू लागलेत की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. रुचिताने विशालबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर आता करण सोनावणेनेही सिंगर प्राजक्ता शुक्रेला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे करण प्राजक्ताच्या खरंच प्रेमात पडलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

प्राजक्ता आणि करण पहिल्या दिवसापासून एकमेकांचे मित्र आहेत. पण, आता त्यांच्यातील हे मैत्रीचं नातं वेगळं वळण घेत असल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात राखीने एन्ट्री घेतल्यानंतर ती घरातलं वातावरण बदलल्याचं पाहायला मिळत आहे. बेडरुममध्ये प्राजक्ताने प्रभूला "तन्वी आणि तुझ्यात किती अंतर आहे? तन्वी तुला असं लहान मुलासारखं का ट्रीट करते?" असं विचारलं. राखीने हे तन्वीला जाऊन सांगितल्यानंतर तिचा पारा चढला. मग तन्वीने प्राजक्ताला "तू करणला कुरवाळतेस. तुम्ही दोघं कायम सोबत असता...ते काय आहे मग? प्रभू माझा लहान भाऊ आहे आणि मी त्याची काळजी घेणार", असं सुनावलं. त्यावरुन दोघींमध्ये बरीच बाचाबाची झाली. 

तन्वीच्या या वक्तव्यानंतर करण आणि प्राजक्तामध्ये यावरुन चर्चा झाली. करण प्राजक्ताला म्हणाला, "'आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो. मला आता तुझी काळजी वाटायला लागलीये. मी याआधी असं कोणासोबत राहिलो. मला इथे पहिल्यांदा तसं फील झालं. आधी माझ्या आई-वडिलांना त्रास झाला की, मला त्रास होतो. पण असं एवढ्या वर्षात माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं झालं. एवढ्या वर्षांचा बंद रस्ता होता, तो आता सुरू झाला, म्हणून मी बोलायला टाळत होतो. मला इमोशनल नाही व्हायचंय, पण मला तो बांध नाही फोडायचा. आपण जेन्युईन असतो". 

त्यावर प्राजक्ता करणला समजावताना म्हणते, "एवढा विचार नको करूस, मला माझं बिग बॉस नंतरचं आयुष्य पण महत्वाचं आहे. लोक लक्षात ठेवतात. आपल्याला सगळं कळतंय. तन्वी जज होणार मी नाही". प्राजक्तासोबत बोलण्यात आधी करण राकेशसोबत बोलताना दिसला. तो राकेशला म्हणाला, "आमच्यामध्ये प्रेम असेल, मैत्री असेल, लग्न असेल... जे काही असेल. पण आम्ही Individual खेळतो". त्यावर राकेश त्याला म्हणाला, "तू फक्त तिला जप. तिच्या भावनांना सांभाळ". आता करण-प्राजक्ताचं हे मैत्रीचं नातं कोणतं नवं वळण घेणार हे पाहावं लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Sonawane falls for Prajakta Shukre? Confesses feelings on Bigg Boss.

Web Summary : Bigg Boss Marathi witnesses budding romance as Karan confesses his feelings to Prajakta. Tanvi's comments spark a debate, with Karan emphasizing their genuine connection. He seeks to protect this bond, while Prajakta advises caution, considering life after Bigg Boss.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६प्राजक्ता शुक्रेटिव्ही कलाकार