Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला या घरात आता थांबायचं नाहीये", अनुश्री माने आणि राकेश बापटमध्ये वादाची ठिणगी, रीलस्टारमुळे अभिनेता संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:12 IST

अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व सुरू होऊन आता एक आठवडा झाला आहे. पहिल्या आठवड्यात घरात झालेल्या राड्यावरुन रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची कानउघाडणी केली. काहींचे कान टोचले तर काहींना रितेशने खेळ चांगला करण्यासाठी सल्ले दिले. आता दुसऱ्या आठवड्यात पुन्हा घरात सदस्यांमध्ये वादावादी झाल्याचं दिसत आहे. अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात बेडवरुन वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनुश्री राकेशला म्हणते, "मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही. जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू". अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा पारा चढला. तो संतापून म्हणाला, "हे बोलणं चुकीचं आहे. हे पुन्हा बोलण्याची हिंमत करू नकोस. आयुष्यात मी २५ वर्ष एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?" त्यानंतर राकेश संतापला आणि त्याने घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. "मला या घरात आता थांबायचं नाहीये", असं म्हणत राकेश तिथून निघून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

त्यानंतर 'बिग बॉस'नेही घराचं दार उघडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आता हा वाद मिटणार की राकेश खरोखरच घर सोडणार? हे पाहावं लागेल. पण, यामुळे घरात नवा वाद पेटला आहे. दरम्यान, पहिल्या आठवड्यात घरातून कोणीच बाहेर गेलं नाही. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यातही करण सोनावणे, अनुश्री माने, दिपाली सय्यद, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रोशन भजनकर, रुचिता जामदार, राधा पाटील आणि सागर कारंडे या सदस्यांवरही नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi: Argument between Anushree Mane and Rakesh Bapat.

Web Summary : Anushree and Rakesh clash over bed space in Bigg Boss Marathi. Rakesh gets angry and threatens to leave the house after a heated exchange.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राकेश बापटटिव्ही कलाकार