बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन सुरू होऊन १४ दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील पहिला सदस्य निखिल राजेशिर्के नुकताच घराबाहेर पडला आहे. घरातील सदस्यांमध्ये रुसवे फुगवे, धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. दरम्यान कालपासून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा आणि विकासची नोकझोक दिसून येते आहे. कालदेखील अपूर्वाने विकासला चांगलेच बजावले.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}अपूर्वाने विकासला बजावले जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे... माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आजपण दोघांमध्ये मजेशीर गप्पा बघायला मिळणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले’ “पुढच्या वेळेस मी जीपण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन”.
विकासचे त्यावर म्हणणे आहे "जेवण मग ... ? त्यावर अपूर्वाने बजावले, "विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही. मी अशी सुगरण नाहीये... मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकतं, तरी तू मला उचलशील... ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस त्याअर्थी...” विकास म्हणाला, “मला पण वाटतं आहे...” त्यावर अपूर्वाने विकासाला दिले भन्नाट उत्तरं "पण हि संधी मी तुला देणार नाही." हे ऐकताच सगळयांना घरात हसू फुटले.अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता.