Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना पांचाळच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला याड लागेल, व्हिडिओद्वारे तुम्हाला गरबा खेळण्याचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 09:40 IST

‘ओढणी उडें….’हे गाणं गेली अनेक वर्षे गरबा प्रेमींना थिरकायला भाग पाडत असून त्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने रसिकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नाही. मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे. बिग बॉसचे दुसरं पर्व संपलं तरी अजूनही हिनाची चर्चा सुरू आहे. त्यातच सोशल मीडियावरील तिच्या नव्या व्हिडिओने रसिकांना अक्षरशा वेड लावलं आहे. ‘केम छो’ या कॅपशनसह हिनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना ‘ओढणी….’ या गरब्याच्या गाण्यावर स्वतःसह थिरकण्यासाठी निमंत्रित करत आहे. या व्हिडिओमध्ये या गाण्यावर थिरकणाऱ्या हिनाच्या अदांचा जलवा पाहायला मिळत आहे. हिनानं पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी गुजराती कलाकुसरही पाहायला मिळत आहे. तिचा मेकअप गुजराती लूकला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे. हिनाच्या डान्स स्टेप्स आणि तिचे हावभाव चित्रपटसृष्टीतील दिग्गज डान्सर्सनाही लाजवतील असेच आहेत. ‘ओढणी उडें….’हे गाणं गेली अनेक वर्षे गरबा प्रेमींना थिरकायला भाग पाडत असून त्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही. 

त्यामुळेच आजही दांडिया गरब्यात हे गाणं सर्वात आधी वाजवलं जातं. हिना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असली तरी तिचं गुजरातीवरही तितकंच प्रेम आहे. कारण गुजराती तिची मातृभाषा आहे. डान्स हे तिचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळेच काम म्हणून आणि आवड म्हणून डान्स तिच्यासाठी सर्वस्व आहे. 

टॅग्स :हिना पांचाळ