Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:44 IST

'बिग बॉस' फेम अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. भोजपुरी अभिनेता आणि गायक दीपक ठाकूरचा शुभविवाह झाला आहे. 

दिवाळीनंतर सध्या सगळीकडेच लगीनसराई सुरू आहे. कलाविश्वातही सनई चौघडे वाजत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस' फेम अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. भोजपुरी अभिनेता आणि गायक दीपक ठाकूरचा शुभविवाह झाला आहे. 

'बिग बॉस' फेम दीपक ठाकूर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. रविवारी(२४ नोव्हेंबर) दीपकने गर्लफ्रेंड नेहा चौबेसह सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपक आणि नेहाने लग्नगाठ बांधली. मोठ्या दिमाखात त्याचा लग्नसोहळा पार पडला. दीपकची पत्नी नेहा एक सामाजिक कार्यकर्ती आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

भोजपुरी गायक असलेल्या दीपकने बॉलिवूडही गाजवलं आहे. 'गँग ऑफ वासेपूर', 'भैय्या जी', 'बेवफाईयाँ', 'द ब्रॉलर' या सिनेमांमधील काही गाणी त्याने गायली आहेत. 'बिग बॉस १२' मध्येही तो सहभागी झाला होता. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग