Join us

"मी स्वतःला बर्बाद करत असेल तर..."; वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेल्या अभिनेत्रीने सर्वांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:00 IST

बिग बॉस फेम अभिनेत्रीने वाढलेल्या वजनामुळे होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल संतप्त पोस्ट केलीय

अभिनेत्रींना अनेकदा वाढत्या वयांनुसार विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना फॅन्सच्या टिकेला सामोरं जावं लागतं. अशीच एक अभिनेत्री सोशल मीडियाच्या कमेंट्ना चांगलीच वैतागलेली दिसतेय. वाढलेल्या वजनावरुन नेटकरी वारंवार ट्रोल करत असल्याने अभिनेत्रीने तिच्या फॅन्सला उत्तर देऊन बोलती बंद केलीय. ही अभिनेत्री आहे बिग बॉस हिंदीच्या १६ व्या सीझनमध्ये सहभागी झालेली सुंबुल तौकिर खान.  (sumbul taukir khan)सुंबुलने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तरटीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसमध्ये झळकलेली सुंबुल खानने तिचं वाढलेलं वजन आणि बदलत्या लूक्सला लोक जे ट्रोल करत आहेत त्याविषयी लांबलचक पोस्ट लिहून सर्वांना सुनावलं आहे. "माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल तुम्ही सर्व ज्या कमेंट करत आहात त्यामुळे मला त्रास होतोय. मला इतका मनस्ताप आजवर कधी झाला नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या वाढलेल्या मी माझं आयुष्य बर्बाद करतेय तर मला तसं करु द्या. कारण मला माहितीये मी काय करतेय. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचून मी आता थकले आहे."वाढलेल्या वजनाचं कारण काय?

सुंबुल खानने तिचं वजन का वाढलं याचं कारण सांगितलं. सुंबुलचे सायकोलॉजिस्ट आणि न्यूरोलॉजिस्टने तिला काही औषधं दिली होती. त्या ओषधांचा वेगळाच इफेक्ट झाल्याने सुंबुलचं वजन वाढलं, असं तिने सांगितलं. त्यामुळे सर्वांनी कृपया मला नावं ठेवणं बंद करावं, अशी विनंती तिने केलेली दिसतेय. सुंबुलने सलमान खानचं होस्टिंग असलेला बिग बॉस १६ मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे लोकांच्या ट्रोलिंगचा कलाकारांना किती त्रास होतो हे यावरुन पाहायला मिळतं. 

 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजन