Bigg Boss 19: सगळीकडे उत्साहाने साजरी होणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण, बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना यावर्षी एकमेकांशिवाय दिवाळी साजरी करावी लागणार आहे. दिवाळीनिमित्त सदस्यांना बिग बॉसने खास सरप्राइज दिलं आहे. सदस्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून खास पत्र मिळालं आहे.
बिग बॉसच्या घरातून एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कबूतर घरातील सदस्यांसाठी त्यांच्या कुटुंबीयांचे पत्र घेऊन आल्याचं दिसत आहे. कुटुंबीयांचे पत्र पाहून घरातील सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेलाही कुटुंबीयांचं पत्र मिळालं. "प्रणित एकही दिवस असा गेला नाही. जेव्हा आम्हाला तुझी आठवण नाही आली. तुझ्याविना दिवाळी अपूर्ण वाटतेय", असं प्रणितला मिळालेल्या पत्रात लिहिलं आहे. पत्र वाचून प्रणितला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे.
मृदुल तिवारीलाही कुटुंबीयांकडून पत्र मिळतं. मृदुलही त्याच्या भावाने लिहिलेलं पत्र वाचून भावुक झाल्याचं दिसत आहे. कुनिका, तान्या, नेहाल, गौरव घरातील सगळेच सदस्य पत्र वाचून कुटुंबीयांच्या आठवणीत भावुक झालेले दिसत आहेत. यामध्येच एक मोठा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. कॅप्टन असलेली फरहाना नीलमच्या घरातून आलेलं पत्र फाडताना दिसणार आहे. त्यामुळे आता घरात मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे.
Web Summary : Bigg Boss housemates received Diwali letters from family. Pranit More cried reading his. Mridul Tiwari also became emotional. Farhana will tear Neelam's letter, creating drama.
Web Summary : बिग बॉस के घरवालों को परिवार से दिवाली के पत्र मिले। प्रणित मोरे अपना पत्र पढ़कर रो पड़े। मृदुल तिवारी भी भावुक हो गए। फरहाना नीलम का पत्र फाड़ देंगी, जिससे ड्रामा होगा।