Join us

Bigg Boss 18: किम कार्दशियन 'बिग बॉस'च्या घरात घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 10:58 IST

अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. किम कार्दशियनसह तिच्या बहिणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Bigg Boss 18: सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसचं १८वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतंच या पर्वात दोन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. अशातच आता पुन्हा बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. किम कार्दशियनसह तिच्या बहिणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस १८मध्ये येण्यासाठी किम कार्दशियन आणि तिच्या बहिणींबरोबर बिग बॉसच्या टीमकडून संपर्क साधण्यात येत आहे. पण, किम कार्दशियन बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार की फक्त गेस्ट म्हणून येणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. डिसेंबरमध्ये बिग बॉसच्या घरात कार्दशियन सिस्टर्स एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. 

किम कार्दशियन ही लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. याआधी ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या छोट्या लेकाच्या लग्नात दिसली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात किम कार्दशियनने हजेरी लावली होती. अंबानींच्या लग्न सोहळ्यातील तिचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानकिम कार्देशियन