Join us

मुलगी असावी तर अशी! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने आईला गिफ्ट केली महागडी कार, चाहत्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:23 IST

अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे.

अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री चाहत पांडेने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. चाहतने स्वत:साठी नाही तर तिच्या आईसाठी ही कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ चाहतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

चाहतने किया कंपनीची काळ्या रंगाची महागडी गाडी आईला गिफ्ट म्हणून दिली आहे. "माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या आईला मी नवी कार गिफ्ट केली. मला सर्वकाही देणाऱ्या माझ्या आईसाठी मी ही छोटीशी गोष्ट करू शकते. तुमच्यासोबत ही बातमी शेअर करायला आनंद होत आहे", असं चाहतने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. या व्हिडिओत चाहत तिच्या आईसोबत गाडी खरेदी करण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. गाडीची चावी आईच्या हातात देत चाहतने आईला खास सरप्राइज दिलं आहे. 

चाहतच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अनेकांनी कमेंट करत चाहतचं कौतुक केलं आहे. चाहत ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'दुर्गा माता की छाया', 'नथ जेवर या जंजीर', 'ऐसी दिवानगी देखी नही कही' यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती. 'बिग बॉस १८'मध्येही चाहत सहभागी झाली होती. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार