Join us

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला पितृशोक, किडनी फेल झाल्यामुळे वडिलांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 13:37 IST

'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला पितृशोक झाला आहे. अभिनेत्री एडिन रोजच्या वडिलांचं निधन झालं आहे.

'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला पितृशोक झाला आहे. अभिनेत्री एडिन रोजच्या वडिलांचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे. लिव्हर आणि  किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अभिनेत्रीने वडिलांसोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. "तुम्ही माझा हात पहिल्यांदा पकडला त्या दिवसापासून ते मी शेवटचा तुमचा हात धरला त्या दिवसापर्यंत...आय लव्ह यू डॅडा", असं कॅप्शन एडिनने या पोस्टला दिलं आहे. 

वडिलांना त्रास होत असल्याने अभिनेत्रीने गेल्या आठवड्यात रविवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण, दोन दिवसांनी मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एडिनच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार