Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17चा ग्रॅण्ड फिनाले रंगणार या दिवशी, हे आहेत टॉप ५ फाइनलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:40 IST

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १७ अंतिम टप्प्यात पोहचला असून फिनालेला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) अंतिम टप्प्यात पोहचला असून फिनालेला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. सलमान खानच्या या वादग्रस्त शोचा ग्रँड फिनाले २८ जानेवारीला होणार आहे. शोमध्ये टॉप ६ फायनलिस्ट बाकी आहेत, त्यापैकी शोच्या एका स्ट्रॉंग स्पर्धकाला आता घरातून बाहेर काढण्यात आले आहे. होय, फिनालेपूर्वीची ही शेवटचे एविक्शन खूपच धक्कादायक होते. विकी जैन शोमधून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यात आयशा खान आणि ईशा मालवीय या दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता या शोसोबतचा विकी जैनचा प्रवास संपला आहे. बिग बॉस १७ च्या फॅन पेजवरून ही माहिती मिळाली आहे. वृत्तांनुसार, फिनालेच्या काही दिवस आधी शोमध्ये मिडनाईट एव्हिक्शन झाले होते, ज्यामध्ये विकी जैनला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

हे आहेत टॉप ५ स्पर्धकवास्तविक, विकी आणि अरुण माशेट्टी यांच्यात स्पर्धा होती, त्यात अरुण जिंकला. अशा परिस्थितीत आता फिनालेच्या शर्यतीतून विकी जैनचा पत्ता कट झाला आहे. आता बिग बॉसला त्याचे ५ अंतिम स्पर्धक सापडले आहेत, त्यापैकी एक स्पर्धक विजेत्याची ट्रॉफी घरी घेऊन जाईल. आता शोमध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

चाहते संतापलेविकी जैन घराबाहेर पडल्याचे समजल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. काही युजर्सना विक्की जैनचं घराबाहेर जाणे योग्य वाटले, तर अनेकांना विकीला घराबाहेर काढल्यामुळे राग आला. लोक म्हणतात की विकी जैन हा चांगला स्पर्धक होता, त्याने आणखी पुढे जायला हवे होते.

अंकिता-विकीमध्ये झाली मोठी भांडणं या शोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यातील संबंध चर्चेत होते. शोदरम्यान दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या शोमध्ये विकी जैन पत्नी अंकितासोबत आला होता. घरात दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. अनेक वेळा पती-पत्नीमधील वाद इतके वाढतात की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे