Join us

बिग बॉस १७ अंतिम टप्प्यात, आयशानंतर कोणाचा होणार पत्ता कट? ढसाढसा रडले विकी-अंकिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:40 IST

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १७च्या अंतिम पर्वासाठी फक्त एक आठवडा बाकी आहे. अशा परिस्थितीत यावर्षी शोचा विजेता म्हणून कोण ट्रॉफी घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १७च्या अंतिम पर्वासाठी फक्त एक आठवडा बाकी आहे. अशा परिस्थितीत शोची उत्कंठा सतत वाढत आहे. यावर्षी शोचा विजेता म्हणून कोण ट्रॉफी घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. आज 'बिग बॉस'च्या फायनल एपिसोडच्या एक आठवडा आधी शोचा शेवटचा वीकेंड वॉर होणार आहे. अलीकडेच, आयशा खानला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर आज वीकेंड का वॉरमधील शोमधून कोणाला तरी बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

आगामी 'वीकेंड का वॉर'चा प्रोमो कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रोमोमध्ये सलमान खान अंकिता लोखंडे, विकी जैन आणि ईशा मालवीय यांची नावे घेताना दिसत आहे. आयशा खाननंतर तिघांनाही एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

प्रोमोमध्ये ज्या स्पर्धकाला बाहेर काढले जाणार आहे, त्याचे नाव जाहीर केले नसले तरी, सलमान खानच्या घोषणेनंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकमेकांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. प्रोमो समोर आल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.

ईशा मालवीयाचा प्रवास संपणार?खरेतर, बिग बॉसच्या फॅन पेज 'द खबरी'ने दावा केला आहे की ज्याला घरातून बाहेर काढण्यात येणार आहे ती दुसरी कोणीही नसून ईशा मालवीय आहे. आयशा खाननंतर आता ईशा मालवीयाचा बिग बॉसचा प्रवास फायनलच्या एक आठवडा आधी संपणार आहे. आता हा दावा किती खरा आहे हे तुम्हाला आजच्या वीकेंड का वॉरमध्ये कळेल.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे