Join us

Bigg Boss 17: लग्नानंतरही या कारणामुळे एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन, अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:13 IST

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन बहुतेक वेळा भांडताना दिसतात. दोघे एकत्र का राहत नाहीत याचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस(Bigg Boss 17)च्या घराचा भाग बनले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांना अंकिता आणि विकीचे रोमँटिक क्षण नेहमीच पाहायला मिळतात. त्यानंतर, जेव्हा हे जोडपे बिग बॉसमध्ये आले तेव्हा चाहत्यांना वाटू लागले की शोमध्ये त्यांची रोमँटिक बाजू पाहायला मिळेल. मात्र बिग बॉसमध्ये त्यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. अंकिता आणि विकी सतत भांडताना दिसतात, कधी विकी अंकितावर रागावलेला दिसतो तर कधी अंकिता कुठल्यातरी कोपऱ्यात रडताना दिसते. अंकिता आणि विकीच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत पण तरीही दोघेही एकत्र राहत नाहीत. अंकिताने यामागचे कारण सांगितले आहे.

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिता लोखंडेने ईटाइम्सशी केलेल्या खास मुलाखतीत सांगितले होते की, ती बिग बॉसच्या घरात का जात आहे. अंकिताने सांगितले होते की, शोमध्ये जाण्याचे कोणतेही खास कारण नव्हते. या वर्षी जायचा विचार केला. जर मी विकीसोबत जात असेल तर तो माझा आधार आणि ताकद असेल.

विकी आणि अंकिता एकत्र राहत नाहीतअंकिता पुढे म्हणाली की, मी हा आम्हा दोघांसाठी ४ महिन्यांचा प्रवास मानत आहे. एकत्र आनंद घेण्याची ही आमची संधी आहे. आम्ही एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते, विकी त्याच्या व्यवसायामुळे बिलासपूरला राहतो. तो दोन्ही शहरात प्रवास करत असतो. आम्हाला हनिमूनच्या वेळी २० दिवसांपेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच मला एकत्र राहण्याची ही चांगली संधी वाटली.बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यातील भांडण चाहत्यांना आवडत नाही. विकी ज्या पद्धतीने अंकिताशी बोलतो. त्यासाठी त्याला सलमान खाननेही फटकारले आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉस